इचलकरंजी:प्रतिनिधी
दि: ३१ जानेवारी दिनांक २७/०१/२०२२ रोजीच्या सायंकाळी १९.२० वाचे सुमारास बिरदेव मंदिराचे मागील रिकामे माळात रेंदाळ येथे श्रीधर सदाशिव मोर रा. माने नगर, रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर हे निरंजन शेटे यांच्या मालकीच्या फर्मच्या प्रोडक्शन विभागातून चांदीच्या कच्चा मालाच्या पिशव्या दुचाकीवरून घेवुन परत येत असातना दोन मोटर सायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमापैकी एकाने त्यांच्या मोपेडला समोर धडक देवून त्यांच्या मोपेडवरील एक पिशवी खाली पडलेने त्यांना बोलण्यात गुंतवून दुस-या मोटर सायकलवरील मागे बसलेल्या इसमाने सदरची चांदीची पिशवी अंदाजे १२ किलो १३८ ग्रॅम वजनाची किंमत एकूण ४,९७,०००/ रु किंमतीची जबरीने चोरून नेली होती, त्या पाठोपाठ पहिला इसम आपली मोटरसायकल सह पोबारा केल्याने यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून हुपरी पोलीस ठाणे गु.र.नं. १३/२०२२, भा.दं.वि.सं.क. ३९२,३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर यांनी सदर जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत समक्ष सुचित केले होते. त्याप्रमाणे मा. प्रमोद जाधव, पोलीस निरीक्षक, स्था गु. अ.शा. कोल्हापूर यांनी इचलकरंजी पथकाकडील सहा पोलीस निरीक्षक श्री. किरण भोसले व स्टाफ यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्यासाठी मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे इकडील शाखेकडील पथक समांतर तपास करीत असातना या शाखेकडील पोलीस अंमलदार आयुब गडकरी यांना गोपनिय बातमीदाराकडून मिळाले बातमी प्रमाणे इचलकरंजी ते सांगली जाणारे रोडवर, वडगाव बाजार समिती मेन गेट समोर, इचलकरंजी येथे चार इसम चांदी विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी खात्रीशिल बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, इचलकरंजी कडील पथक येथे सापळा रचून वॉच केला असता, सदर ठिकाणी चार इसम दोन मोटार सायकलसह थांबले असल्याचे दिसले. त्या चार इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, इचलकरंजीकडील पोलीस पथकाने ताब्यात घेवून त्यांची विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे १) ओंकार शिवाजी पाटील, वय २४ वर्षे रा शाहूनगर मराठी शाळे समोर रेंदाळ ता हातकणंगले जि. कोल्हापूर २) सुरेश रामचंद्र माळी, वय २८ वर्षे रा. विरदेवनगर रैदाळ, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, ३) कृष्णा अरुण रावण वय २२ वर्षे, रा. संजय गांधीनगर सांगली नाका इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ४) भरमा बसाप्पा पाथरवट , वय ३५ वर्षे, रा. साईट नं १०२ सहकारनगर इचलकरंजी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर असे असल्याचे सांगितले. त्यांच्या अंगझडतीमध्ये गुन्ह्यात चोरीस गेलेले चांदीचा माल व गुन्हयात वापरलेले ०३ मोबाईल हॅण्डसेट, ०२ मोटार सायकल असा एकूण ५,३०,२१२/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा हा त्यांनी आपल्या आणखीन दोन साथीदार ५) राहूल उर्फ सोन्या पायरवट रा. साईट नं. १०२, सहकार नगर, इचलकरंजी ६) रणजित ऐडके रा. हॉटेल राज कॅसेलचे मागे, इचलकरंजी यांचे मदतीन केल्याचे कबूल केले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी श्री. शैलेष बलकवडे पोलीस अधीक्षक कोल्हापूर, श्री. तिरुपती काकडे, अपर पोलीस अधीक्षक, शहर विभाग, कोल्हापूर, श्री रामेश्वर वैजणे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग, अतिरिक्त कार्यभार इचलकरंजी विभाग, श्री प्रमोद जाधव, पोलीस निरीक्षक स्था. गु.अ.शा. कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वा. गु. अ.शा. कोल्हापूर पथक इचलकरंजी वडील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, सपोपी राजीव शिंदे, खडेराव कोळी, पो. हे को संभाजी भोसले, रणजीत पाटील, प्रशांत कावळे पो बालाजी पाटील, संजय इंगवले, फिरोज बेग, पोकॉ. व.न. अमर शिरढोणे. सोमराज पाटील, आयुब गडकरी, सुरज चव्हाण, चालक यशवंत कुमार तसेच सपोनि उत्कर्ष व विशेष पथक कोल्हापूर व सायबर विभागाकडील सचिन बेंडखळेसैनी केली आहे.