डी.के.टी.ई. च्या सौ. अंजली काडाप्पा सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण

 

इचलकरंजी: विजय मकोटे

दि: २ फेबुवारी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या स्टेट एलिजीबीलीटी टेस्ट (सेट) परीक्षेमध्ये लायब्ररी अ‍ॅन्ड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयामध्ये सौ.अंजली सचिन काडाप्पा या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. डीकेटीईच्या लायब्ररी विभागामध्ये गेली १२ वर्षे त्या लायब्ररी असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत.
सहायक प्राध्यापक होण्यासाठी घेण्यात येणा-या राज्य पात्रता परिक्षेत उत्तम गुणांनी त्या यशस्वी झाल्या त्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांना डी.के.टी.ई. चे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, उपसंचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, लायब्ररी प्रमुख डॉ.जे.एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशामध्ये संपूर्ण कुटुंबियाचे मोलाचे सहकार्य आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.