लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

छोटे कलाम अवार्ड उपकरण स्पर्धेत चे आयोजन

इचलकरंजी: विजय मकोटे

दि .9-येथील लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन  निमित्त छोटे कलाम अवार्ड उपकरण स्पर्धेत जंबुकुमार देवाप्पा हुल्ले प्राथमिक विद्या मंदिर रुई यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या प्रकल्प  स्पर्धेत एकूण सोळा 16 प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते.

           द्वितीय क्रमांक व्यकंटराव हायस्कुलइचलकरंजी, तृतीय क्रमांक- इचलकरंजी हायस्कुल इचलकरंजी,

चतुर्थी क्रमांक – बाहुबली विद्यापीठ संचलित इंग्लिश मिडीयम स्कुल अब्दुल लाट यांनी मिळविला.

        यावेळी डॉ शशीकांत कुंभार सर यांनी विज्ञान म्हणजे काय ? आणि विज्ञानाची व्याप्ती यासंबंधात विविधांगांनी माहिती दिली. त्याचबरोबर आयुर्वेद या विषयावरही दिलखुलासपणे मुलांशी त्यांनी गप्पा मारल्या.

      यावेळी पीएमजेपी ला. विजय राठी क्लब प्रशासक , अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड,खजिनदार ला. महेंद्र बालर , सचिव ला .शैलेंद्र जैन हे उपस्थित होते.

        विज्ञानप्रयोग शाळा यातील स्टेम मॉडेल्स सादरीकरण विनायक माळी सर व राजेंद्र चौगुले यांनी केले.

स्पर्धेतील प्रकल्पाचे परीक्षण सुनील स्वामी व अब्दुल करीम जमादार, डॉ.शशिकांत कुंभार यांनी केले.  बक्षीस वितरण  अध्यक्ष ला. लक्ष्मीकांत भट्टड, खजिनदार ला. महेंद्र बालर, ला. कनक भट्टड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रम माचे  प्रास्ताविक विनायक माळी तर सार्शा माळी मॅडम आभार मानले. सूत्रसंचालन राजेंद्र चौगुले सर यांनी केले.