संगमेश्वर नावडी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माननीय उदय जी सामंत यांच्या हस्ते संपन्न.

संगमेश्वर: प्रतिनिधी
दि:12 संगमेश्वर नावडी ग्रामपंचायत ची इमारत नवीन बांधण्यात आली या ग्रामपंचायतीचे उद्घाटन माननीय उदय सामंत (उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) तथा आमदार रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा आमदार माननीय शेखर निकम या दोघांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले नावडी ग्रामपंचायत च्या नूतन वास्तू उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र महाडिक जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते पंचायत समिती सदस्य वेदांती पाटणे श्री राजेंद्र सुर्वे गटविकास अधिकारी नरेंद्र रेवांडकर श्री दादा कोळवणकर श्री अनिल शेठ भिडे श्री प्रमोद शेटे (तंटामुक्ती अध्यक्ष) माजी सरपंच नवनीता नारकर माजी सरपंच सौ नम्रता शेटे इत्यादी उपस्थित होते.

संगमेश्वर नावडी ग्रामपंचायतीचे सरपंच विवेक शेरे यांनी आमदार माननीय उदय सामंत आमदार माननीय शेखर जी निकम या दोघांचा शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रतिक्षा शेरे याकुब खान श्री बाळा शेटे अभिजीत चोचे यांनी सत्कार केला.