मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, प्रतिनिधी

दि. १३ आधुनिधीक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

            वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

            यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख “कर्तृत्वाचा सह्याद्री” असा केला जातो. इतके महत्वपूर्ण योगदान त्यांनी देशराज्याच्या उभारणीत दिले आहेअसे मुख्यमंत्र्यांनी अभिवादन संदेशात म्हटले आहे.