डी. के. ए.एस.सी. कॉलेजमध्ये इंग्रजी विभागाची कार्यशाळा संपन्न

इचलकरंजी-प्रतिनिधी

दि. १७ येथील डीकेएएससी कॉलेजमध्ये अग्रणी महाविद्यालय  अंतर्गत ‘इंग्लिश फॉर करिअर  ऑपॉर्च्युनिटीज’ या विषयावर इंग्रजी विभागामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे व तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रभावती पाटील, विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर(स्वायत्त) यांनी भविष्यात उज्ज्वल यशासाठी व चांगल्या नोकरीच्या संधीसाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे ही काळाची गरज आहे .त्यासाठी विविध क्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या कोणत्या संधी आहेत याची सखोल माहिती दिली.  कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रामध्ये मार्गदर्शन करताना प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी व विविध क्षेत्रातील  संधींसाठी इंग्रजीच्या अभ्यासाचे महत्व  ओघवत्या भाषेत पटवून दिले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रे तसेच खाजगी व सरकारी क्षेत्रातील नोकरीसाठी इंग्रजीच्या अभ्यासावर भर द्यावा व  आपले भाषिक कौशल्य विकसित करावे असा संदेश दिला.
स्वागत,प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांची ओळख  इंग्रजी विभाग प्रमुख आणि कार्यशाळा संयोजक डॉ. सुनिता वेल्हाळ यांनी करून दिली. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. डी.जी.घोडके यांनी आभार मानले. कु. नम्रता ताटे यांनी सूत्रसंचालन केले तसेच प्रा. संदीप हरगाणे , प्रा मंगेश चेंडके यांनी सहकार्य केले.या कार्यशाळेसाठी अग्रणी कार्यशाळा विभाग प्रमुख डॉ. पी. के. वाघमारे यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी डॉ. डी. सी. कांबळे, प्रो. डॉ. ई. बी.आळवेकर, डॉ. इंगळे, डॉ.गावडे, तसेच अग्रणी योजने अंतर्गत विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी  उपस्थित होते.