कोल्हापूर :प्रतिनिधी
दि. २० मार्च अवैद्य व्यवसायावरील छापा टाकल्यानंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. नेसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक विठ्ठल पाटील (वय ५१, राहणार नेसरी) यांना लाचलुचपत प्रतिबंध पथकाने शनिवारी दुपारी रंगेहात पकडले
गेल्या दोन महिन्यातील एसीबीने लाचखोरप्रकरणी रंगेहात पकडलेल्या पोलिसांची संख्या आता चार झाली आहे . शनिवार दुपारी लाचखोरी प्रकरणी आणखी एकाला अटक झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती .एसीबीचे कोल्हापूर पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नेसरी येथील तक्रारदाराचे अवैध व्यवसाय असल्याची माहिती मिळाल्याने नेसरी पोलिसांनी शुक्रवारी त्याच्यावर छापा टाकून कारवाई केली होती ,त्यानंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी संबंधित सहायक फौजदार पुंडलिक पाटील यांनी तक्रारदारकडे पाच हजार रुपयाची मागणी केली होती.
त्यानुसार त्यांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. ही रक्कम स्वीकारत असताना पथकाने पुंडलिक पाटील यांना रंगेहात पकडले.
संशयित पुंडलिक पाटील याने तक्रारदार व्यक्तीला पाच हजाराची रक्कम घेऊन नेसरी पोलीस ठाण्यात बोलाविले होते रक्कम स्वीकारत असताना पाटील यांना पोलीस ठाण्यातच एसीबी पथकाने रंगेहाथ पकडल्याने काही क्षणात पोलीस ठाण्यासह आवारात एकच खळबळ उडाली होती