सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पटेल यांची आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गनायझेशनच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी निवड

रत्नागिरी : मेहरुनिसा साखरकर

साखरतर येथील सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पटेल यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी चे जिल्हाध्यक्ष हरीश शेखआसन, पत्रकार रहीम भाई दलाल, सामाजिक कार्यकर्ते आतिफ साखरकर यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते निसार राजपुरकर, अकिल साखरकर, नाजिम मुल्ला, जावेद पटेल, सईद साखरकर, आणि साखरतर चे रहिवासी उपस्थित होते.