भैरवगड येथील भैरवनाथ मंदिरात 1 एप्रिल रोजी यात्रा भरणार

आरवली:-

रत्नागीरी आणि सातारा जिल्ह्याच्या सिमेवरती भैरवगड येथील भैरवनाथ मंदिरात पाढव्याच्या आदल्या दिवशी 1 एप्रिल रोजी कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षानंतर मोठ्या थाटामाटात याञा भरणार आहे. या याञेला रत्नागीरी व सातारा जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

त्या दिवशी सकाळी 11 वा.भैरीदेवाला रूप लाऊन प्रमुख मानकर्यांच्या उपस्थित भैरवनाथाची पुजा होईल,नंतर याञेला सुरूवात होईल,राञी 8 वाजता गोवळ या गावच्या तमाशाला सुरूवात ,राञी 9 वाजता रातांबी या गावाच्या तमाशाला सुरूवात होईल,व राञी 11 वाजता श्री भैरवनाथ प्रासादिक नाट्यरूपी रंगीत भारूडी भजन मंडळ पाथरपुंज या गावातील कार्यक्रमाला सुरूवात होईल.सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भैरवगडावर भैरवनाथाच्या याञेला महाराष्ट्रातुन कानाकोपर्यातुन अनेकजनण हजेरी लावत असतात.महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन एवढ्या मोठ्याप्रमात भक्त गण या याञेत उपस्थित असताना देखील पुर्ण याञा होईपर्यंत सातगाव भैरवगड मंदीर मंडळाच्या नियमानुसार सिस्तबद्ध कार्यक्रम दरवर्षी पार पडतो.