आरवली:सचिन पाटोले
श्री.समर्थ हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त रातांबी गावामध्ये दिनांक १५ ते १६ एप्रिल रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
या सप्ताहात दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी रुद्राभिषेक व कळस पूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायन त्यानंतर दुपारी महाप्रसाद,सायंकाळी ४ वाजता ज्ञानेश्वरी पारायण ७ ते ९ सामुदायिक हरिपाठ,रात्री महाप्रसाद रात्री १० वाजता किर्तन होईल.
दिनांक १७ रोजी पहाटे काकड आरती,सकाळी ६:२३ मिनिटानी हनुमान जन्मोत्सव सोहळा, सकाळी ११.०० वाजता काल्याचे किर्तन, दुपारी सत्यसत्यनारायणाची महापुजा होईल.