कुरधुंडा-गावमळा येथे वीरशैव लिंगायत समाज मर्यादित कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा

संगमेश्वर:-
संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा-गावमळा येथील “जय हनुमान सेवा मंडळ” आयोजित वीरशैव लिंगायत समाज मर्यादीत भव्य दिव्य जय हनुमान कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा गुरुवार १४ ते शुक्रवार १५ एप्रिल या कालावधीत “श्री हनुमान मंदिर-गावमळा येथे रंगणार आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १४ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता ज्येष्ठ उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी संगमेश्वर पोलीस निरीक्षक उदय झावरे, वीरशैव लिंगायत समाज जिल्हाध्यक्ष अण्णा लिंगायत, कुरधुंडा सरपंच सबा जमुरत अलजी, माजी सरपंच जमुरत अलजी उपसरपंच तैमुर अलजी, तालुकाध्यक्ष भाई लिंगायत, ग्राम.सदस्य संगीता लिंगायत, नाट्यलेखक दीपक लिंगायत, ज्ञानदीप प्रतिष्ठान रत्नागिरी अध्यक्ष प्रितेश हेदवीकर, तालुकाध्यक्ष रत्नागिरी-सचिन लिंगायत, जे.एम.इन्फ्रा प्राय. लिमिटेड जन. मॅनेजर एच.एम.हळशेठ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शनिवारी १६ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ९ वाजता या ठिकाणी जन्मोत्सव व आरती, दुपारी १ ते ३ ग्रामस्थांचे भजन, सायंकाळी ३ ते ६ वरद शंकराची पूजा, रात्री ७ ते ९ महंत ह. भ. प. अनंतदास महाराज लिंगायत यांचे सुश्राव्य किर्तन, तर रात्री ९.३० वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व समाज बांधवांनी या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

143