इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १३ एप्रिल कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.सतेज पाटीलसो यांचे 50 व्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध उपक्रम राबविले गेले.यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा मध्ये जवळपास 200 विद्यार्थी-विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला.या स्पर्धाचा बक्षीस समारंभ शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री.संजय कांबळे यांचे हस्ते करण्यात आले
.तसेच शहर काँग्रेसच्या कार्यालयाखाली पाणपोईचे उद्घाटन महीला काँग्रेसचे अध्यक्ष सौ.मीनाताई बेडगे वहीनी यांनी केले.याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार योजनांचे प्रमाणपत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्री.शशांक बावचकर यांचे हस्ते करण्यात आले.तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या इचलकरंजीच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळे वाटप करण्याचा कार्यक्रम श्री.राहुल खंजीरे, श्री.बाबासाहेब कोतवाल यांचेहस्ते करण्यात आला.या सर्व कार्यक्रमांना श्री.शशिकांत देसाई, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, हारुण खलीफा, किशोर जोशी, दिलीप पाटील, योगेश पंजवानी, ताहीर खलीफा,शेखर पाटील, प्रमोद नेजे, संग्राम घुले, उदय गीते, रवी वासुदेव, समीर शिरगावे,सचीन साठे, युवराज कांबळे, सतीश कांबळे, योगेश कांबळे, अमीर सपसागर, रवी पाटील, तोसीफ लाटकर, सुमीत बाबर,शोयेब मोमीन सौ. अनिता बिडकर, बिस्मिल्ला गैबान, अनिता गायकवाड यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.