स्वातंत्र्य आंदोलनाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन राज्यभर करावे

सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

मुंबई-प्रतिनिधी 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्व धर्मातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता, या बाबतचे अस्सल दस्तऐवज शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाकडे जतन करून ठेवलेले आहेत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या अभिलेखांची माहिती जनतेला, अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्याविषयीची समग्र दर्शवणारे प्रदर्शन आज सुरू होत आहे, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 6 एप्रिल ते 16 एप्रिल हा कालावधी शासनाने समता आठवडा म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या प्रदर्शनाच्या उदघाटना प्रसंगी दिली,

आज पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन पटावर आधारित छायाचित्रे व कागदपत्रे यांचे प्रदर्शनाचे उदघाटन सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते मुंबईत झाले यावेळी ते बोलत होते,  स्वातंत्र्याचा खरा इतिहास जनतेसमोर जाण्यासाठी अशा प्रदर्शनाचे महाराष्ट्रभर आयोजन करावे असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितले,

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनाकार म्हणून जनतेला माहिती आहेत, पण ते द्रष्टे होते, त्यांचा व्यासंग किती मोठा होता आणि त्यांचे ज्ञान किती अगाध होते याची माहिती हे प्रदर्शन पाहिल्यानंतर होते, त्यामुळे हे प्रदर्शन सर्वांना आवडेल असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले, आणि या सुंदर व अभ्यासपूर्ण प्रदर्शनाबद्दल पुराभिलेख संचालनालयाचे संचालक श्री सुजित कुमार उगले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सर्वसामान्यांसाठी उपक्रम राबविण्याची सर्वात मोठी जबाबदारी सांस्कृतिक कार्य विभागाकडे दिली आहे ती प्रभावीपणे राबविण्यात येईल असेही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी सांगितले,

यावेळी सांस्कृतिक कार्य, व पुराभिलेख संचालनालय विभागाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.