अ व्हॅलेंटाईन्स डे” हा पहिला आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट रत्नागिरीकराचा

 

रत्नागिरी : मुजीब खान

दि. १३ एप्रिल अ व्हॅलेंटाईन्स डे” हा मराठी चित्रपट मराठीसह इंग्रजी, स्पॅनिश अशा विविध भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.मर्चंट नेव्हीमध्ये गेली २२ वर्षे कॅप्टन असलेला रत्नागिरीचा सुपुत्र फैरोज अनवर माजगावकर यांच्यामुळे हा चित्रपट मराठीसह इंग्रजी, स्पॅनिश अशा विविध भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.असा बहुमान मिळवणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.
माजगावकर हे मूळचे रत्नागिरीचे आहेत. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीतच झाले.अ व्हॅलेंटाईन्स डे” या आपल्या पहिल्या चित्रपट निर्मितीमध्ये ते आणि त्यांचा मुलगा अदीन माजगावकर महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहेत.गोल्डन स्ट्राईप्स एन्टरटेन्मेंट कंपनी आणि कियान फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर सहयोगी निर्माते अनन्या फिल्म्स आहेत. लेखक, दिग्दर्शक अजित दिलीप पाटील आणि कार्यकारी निर्माते सोमनाथगिरी आहेत. या चित्रपटाचे उत्कंठावर्धक टीझर पोस्टर रिलिज करण्यात आले. या चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठीतील बड्या अभिनेत्याचा समावेश आहे. तसेच या चित्रपटाच्या टेक्निकल टीममध्ये बॉलिवूड व इजिप्शियन फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांचा समावेश आहे. चित्रपटाचे शूटिंग देशातील विविध शहरांसह कोकणात होणार आहे.