इचलकरंजी: संजय आंबे
दि. १३ एप्रिल येथील डी.के.ए.एस.सी.महाविद्यालयातील एनसीसी विभागातील एनसीसी कॅडेंटस्नापंचगंगा नदी मध्ये बोटिंग मधील कायाकिंग, रोइंग याचे प्रशिक्षण “वरद विनायक बोटिंग क्लब” यांच्यातर्फे देण्यात आले. या क्लबचे श्री गणेश बरगाले व त्यांचे सहकारी आंतरराष्ट्रीय खेळाडू अमोल बरगाले, राष्ट्रीय खेळाडू शिवाजी बरगाले, आदिनारायण कुंभार, व बाळासाहेब डांगे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी कॅडेट्सना प्रशिक्षण दिले.
आपत्कालीन व्यवस्थेसाठी व विविध स्पर्धेसाठी या प्रशिक्षणाचा मुला-मुलींना नक्कीच खूप फायदा होणार आहे, तसेच कायाकिंग व रोइंग मध्ये नॅशनल झालेल्या मुला-मुलींच्या आर्मी व पोलीस भरती साठी प्रथम प्राधान्य आहे. या खेळाचा आर्मी व पोलीस विभागामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होतो म्हणून महाविद्यालयातील एन.सी.सी विभागाच्या कॅडेट्स ना हे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी बोलताना गणेश बरगाले यांनी बोटिंगचे नियम त्याचे फायदे व सुरक्षितता कशी असावी या विषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक बोटिंग करत असताना दिले. एनसीसी च्या सर्व कॅडेट्सनी आनंदाने हे प्रशिक्षण घेतले आहे.
या प्रशिक्षणामध्ये एनसीसी मधील सुप्रिया उळे, साक्षी पाटील, राहुल रेंदाळे, आदित्य उत्तुरे व इतर कॅडेट्स यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. व्ही.एस ढेकळे यांनी मुलांना प्रोत्साहन दिले. प्रा. मेजर मोहन विरकर यांनी एनसीसी कॅडेट्स या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.एनसीसी कॅडेट्सना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले व अशी संधी त्यांनी दिली,त्यासाठी एनसीसी विभागप्रमुख प्रा. मेजर मोहन विरकर यांनी “वरद विनायक बोटिंग क्लब” चे महाविद्यालया मार्फत आभार मानले.या प्रशिक्षणासाठी एकूण 25 एनसीसी कॅडेट्स व प्राध्यापक मेजर मोहन विरकर हजर होते.