संगमेश्वर :- (साद्दीक नाईकोडी)
युपीएससी परिक्षेत पहिली आलेली प्रियंवदा अशोक म्हाडदळकर हिच्या यशाने चिपळूणकरांचे नाव रोशन केले आहे. अशोक म्हाडदळकर हे कोकण विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून रत्नागिरी येथे निवृत्त झाले असून चिपळूण येथील विरेश्वर कॉलनी त्यांचे निवासस्थान आहे.
मुळची वेंगुर्ला उभादांडा येथील रहिवासी असलेल्या प्रियवंदा म्हाडदळकर चिपळूण शहरातील विरेश्वर कॉलनी येथे त्यांचे घर आहे.प्रियवंदा हिने व्हिजेटीआयमधून अभियांत्रिकीची पदवी, आयआयएम बंगळुरु येथून व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमबीए), खासगी क्षेत्रातील वाटचालीसाठी खणखणीत म्हणावी अशी पात्रता असूनही प्रियंवदा म्हाडदळकरला प्रशासकीय सेवेने खुणावले. प्रियंवदाला केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या लोकसेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत देशात तेरावे स्थान मिळाले आहे.