इचलकरंजी : संजय आंबे
दि. ०८ जुलै : डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणा-या ४ विद्यार्थ्यांची नामवंत वंडर ब्लू या कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. वंडरब्लू, बेंगलोर येथे डिकेटीई डिप्लोमाचे निवड झालेले ४ विद्यार्थी विविध पदावर रुजू झाले आहेत.
वंडरब्लू, ही कंपनी बेंगलोर येथे असून या कंपनीचे जीन्स, टी शर्टस, कार्गोस, स्कर्टस्, लहान मुलांचे कपडे यामध्ये प्रसिध्द असून, वंडरब्लू गारमेंट वाशिंग या प्रक्रियेसाठी अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. यावर्षी या कंपनीमार्फत ऑनलाईन आयोजित रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्हयूव अशा अनेक फे-यामधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमताची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे एकूणच शैक्षणिक गुणवत्ता यावरुन त्याची उत्तम पॅकेजसह निवड केली. सदर वंडरब्लू कंपनीमध्ये दिगंबर इंगवले, सारिका पाटील, उत्कर्ष तांबेकर व तेजस्वीनी धंदाले या डिप्लोमा प्राप्त विद्यार्थ्यांची निवड झाली.
डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रिसर्च इंडस्ट्री मधील तज्ञांना संस्थेमध्ये बोलावून ज्ञान उपलब्ध करुन दिले जाते. विविध औद्योगिक भेटीबरोबरच डीकेटीईत अनेक विषयावर कार्यशाळा, चर्चासत्रे, सेमिनार आयोजित करुन इंडस्ट्रीजमधील व्यक्तींशी चर्चा केली जाते. येथे उपलब्ध असलेली सुस्सज अशा प्रयोगशाळा, इंडस्ट्री इंटरअॅक्शन या सवार्ंचा विद्यार्थ्यांना अशा नामवंत कंपन्यामध्ये निवड होण्यासाठी लाभ होत असतो.
डीकेटीईमध्ये टेक्स्टाईल मध्ये डीप्लोमा इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर्स, डीप्लोमा इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, डीप्लोमा इन फॅशन अॅण्ड क्लोदीग टेक्नॉलॉजी हे कोर्सेस उपलब्ध आहेत. टेक्स्टाईल ही वेगळी शाखा अत्यंत वैविध्यपूर्ण असणारी आहे. त्यामुळे गेली ३६ वर्षे डीप्लोमा टेक्स्टाईल विभागात १०० टक्के प्लेसमेंट होत आहे त्यामुळे १० वी नंतर टेक्स्टाईल मधील डीप्लोमा हा एक उत्तम करियरचा मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.
सदर विद्यार्थ्यांच्या निवडीबददल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर.व्ही.केतकर,सचिव डॉ सपना आवाडे यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांस संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले,उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील,डीप्लोमा विभागप्रमुख प्रा.आर.के. वळसंग यांचे मागदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी प्लेसमेंट ऑफीसर प्रा. एस.बी.अकिवाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.