संगमेश्वर बस स्थानकातील प्रसाधनगृह गेले दहा दिवस बंद,लांब पल्ल्याच्या प्रवाशांची गैरसोय.

संगमेश्वर:सचिन पाटोले

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बस स्थानकातील प्रसाधनगृह गेले दहा दिवस बंद असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती संगमेश्वर बसस्थानक आहे.बस स्थानकातून मुंबई गोवा पुणे आदी शहराकडे जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या बस सुटतात तसेच ग्रामीण भागातील बसेसही या बस स्थानकातून सुटतात. चिपळूण-रत्नागिरी दरम्यान मध्यवर्ती असणाऱ्या या बस स्थानकामध्ये स्वच्छतागृह आहे मात्र गेले दहा दिवस ते बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय  होत आहे. त्यामुळे हे प्रसाधनगृह लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

133