रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हा परिषद आणि पंचात समिती आरक्षण सोडत येत्या २८ जुलै २०२२ रोजी काढण्यात येणार आहे.रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत 28 जुलै 2022 रोजी दुपारी ३ वाजता शहरातील सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर येथे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीची आरक्षण सोडत कार्यक्रम त्याच दिवशी म्हणजे 28 जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्या त्या संबंधित तहसीलदार यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
संंगमेश्वर पंचायत समितीची आरक्षण सोडत छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती, संगमेश्वर देवरुख येथे निघणार आहे.तर या आरक्षण सोडतीवर २९ जुलै ते २ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्हाधिकारी तसेच संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करावयाचा कालावधी आहे.