महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा रत्नागिरीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

रत्नागिरी :-

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर येथे उत्साहात संपन्न झाली. जिल्हा शाखेचे अध्यक्ष घवाळी सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आदर्श पुरस्कार प्राप्त झालेल्या सौ. गीता सावंत , प्रकाश कदम  सुनील डांगे , सौ. ऋजुता माईणकर  या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सभेमध्ये नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.(१)अध्यक्ष-दीपक घवाळी(२)कार्याध्यक्ष-समीर खोत(३)उपाध्यक्ष-विनोद नारकर व मुरीदा काजी(४)सचिव-सुनील डांगे(५)सहसचिव-हणमंत ऐवळे सर व अन्य पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.संघाची रत्नागिरी तालुका नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.(१)अध्यक्ष-प्रकाश कदम(२)उपाध्यक्ष-भारती खेडेकर(३)सचिव-प्रवीण मोरे व अन्य पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील पाच वर्षांतील कार्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

महासंघाच्या प्रयत्नातून झालेले महत्त्वाचे निर्णय  पुढीलप्रमाणे:(१)प्राथमिक शिक्षकांचा स्वतंत्र वेतन पथकामार्फत बँकेतून पगार(२)सन १९७७ चा कायदा व १६ जुलै १९८१ ची नियमावली(३)सन १९७९ पासून शिक्षकांना पेन्शन योजना(४)विनाअनुदानित सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीस व निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरावी(५)रजा प्रवास सवलत योजना(६)मुख्याध्यापकांच्या दीर्घ सुट्टीतील रजा व त्यांचे रजा रोखीकरण करणे(७)५०० पेक्षा जास्त पटाची अट पूर्ण करणाऱ्या शाळांना शिक्षकेतर कर्मचारी मंजुरी(८)अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन.

(१)सन २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे(२) तुकड्यांना अनुदान देणे(३)आरटीई २००९ नुसार संचनिश्चिती व स्वतंत्र मुख्याध्यापक पद(४)लोकसभा व विधानसभा निवडणुकीची कामे शिक्षकांना न देणे(५)शाळांना वेतनेतर ४% अनुदान निर्धारण करून मिळणे इ.अध्यक्षांनी जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. शिक्षकांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत व पुढील पाच वर्षात त्यासाठी प्रामाणिकपणे सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असा विश्वास घवाळी यांनी व्यक्त केला. सभेच्या शेवटी कदम सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व व सभेची सांगता झाली.

163