*पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस साजरा*
देवरूख:
साडवली येथिल पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भारतीय सेनेमध्ये काम केलेल्या तीन माजी सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये माजी सैनिक अमर चाळके, पुंडलिक पवार व महेश सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक अमर चाळके यांची मुलाखत घेण्यात आली.सदर मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या जीवनातील काही प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले तसेच सरकारने नविनच सुरू केलेल्या अग्नीरथ योजनेचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
त्याचप्रमाणे माजी सैनिक पुंडलिक पवार व महेश सावंत यांनीही भारतीय सेनेबद्दल माहिती सांगितली.त्यामुळे विद्यार्थ्यांना कारगिल युद्ध व भारतीय सेना याबाबतची विस्तृत माहिती मिळाली.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी परिषदेने केले होते.सदर कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.सुभाष बने साहेब,पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रोहन बने प्रा.प्रदिश कलंगडन सर,पर्यवेक्षक,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.