देवरुख:-
शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व गुरूवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरूख येथे काल मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी,शाळेचे/संस्थेचे संस्थापक कै.गोपाळ वामन तथा काकासाहेब पंडित यांचे पुण्यस्मरण असल्यामुळे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सदानंद भागवत व शाळा समिती अध्यक्षा नेहाताई जोशी यांनी कै.गोपाळ वामन तथा काकासाहेब पंडित यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
काकासाहेब यांनी दिलेल्या योगदानाची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर वृंद व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून कै.काकासाहेब पंडित यांना अभिवादन केले.