देवरूख आकार ऑर्गनायझेशन रन तिरंगा मॅरेथाॅन स्पर्धेत हजार स्पर्धक धावले

देवरुख:
क्रांती दिना निमित्त घेण्यात आलेल्या देवरुख आकार ऑर्गनायझेशन जिल्हा स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा 10 ते 14 वर्षे वयोगट मुले व मुली,महिला खुला गट व पुरुष खुला अशा चार गटात घेण्यात आली.मुले-मुली व महिलांसाठी ३ कि.मी.अंतर तर पुरुष खुल्या गटासाठी ८ किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते.चारही गटातील प्रथम पाच क्रमांकांना रोख रक्कम व आकर्षक चषक देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.मुलींच्या गटात सौरभी महेश गुरव (लांजा) प्रथम,श्रेया सिध्देश्वर मार्कंड (लांजा) द्वितीय,आर्या अनंत सुवरे (संगमेश्वर पूर) तृतीय,आर्या संजय झेपले (संगमेश्वर पूर) चतुर्थ तर रुद्रा संदीप शिवगण (संगमेश्वर पूर) हीने पाचवा क्रमांक पटकावला.मुलांच्या गटामध्ये साईप्रसाद उज्वल वराडकर (दापोली) प्रथम,दिगंबर रविंद्र गवंडी (संगमेश्वर) द्वितीय,विराज बडद (संगमेश्वर) तृतीय,मकरंद धनवंद चव्हाण (संगमेश्वर) चतुर्थ तर नयन राजाराम लिंगायत (संगमेश्वर) याने पाचव्या क्रमांकाची बाजी मारली.

    महिला खुला गटात प्रमिला पांडुरंग पाटील (चिपळुण) प्रथम,निकिता अतुल येरले (चिपळुण) द्वितीय,शिल्पा शंकर केंबळे (दापोली) तृतीय,योगिता धोंडू तांबडकर (संगमेश्वर) चतुर्थ कमांक तर सिध्दी राजाराम मांडवकर (लांजा) यांनी पाचवा क्रमांक मिळवला.याबरोबरच पुरुष खुल्या गटामध्ये ओंकार विष्णू बैकर (चिपळुण),अनिकेत अनंत चांदिवडे (चिपळुण),सिध्देश पांडुरंग बर्जे (दापोली),अक्षय परशुराम पडवळ (संगमेश्वर),ओंकार अनंत चांदिवडे (चिपळुण) यांनी अनुकमे प्रथम पाच क्रमांक पटकावले आहे.चारही गटातील प्रथम पाच क्रमांकाना आकर्षक चषक देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

     

     स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षिस वितरण प्रसंगी खासदार विनायक राउत,आमदार शेखर निकम,राजन साळवी,माजी राज्यमंञी रवींद्र माने,पित्रे फाॅंडेशनचे अध्यक्ष प्रायोजक अजय पित्रे,प्रायोजक हाईपनेक्स्टचे श्रीधर बने,तहसीलदार सुहास थोरात,सीईओ चेतन विसपुते,नगराध्यक्षा सौ.मृणाल शेट्ये, राजेंद्र महाडीक,संतोष थेराडे, सदानंद भागवत,अभिनेते असित रेडीज,शंकर भुवड,आकारचे अध्यक्ष निलेश चव्हाण,पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव,उदय झावरे,राजेश पाथरे,बंड्या बोरुकर,सागर शेट्ये,आशिष प्रभुदेसाई,पुष्कर शेट्ये,बाळा कामेरकर आदि उपस्थित होते.बाबा सावंत,सुरेश बने,मुझ्झफर खतीब,मनोहर गुरव,संतोष केदारी,मामा गानू,दिपक कराळे यांचेही योगदान लाभले.सुत्रसंचालक प्रमोद हर्डीकर,युयुत्सू आर्ते,सुरेंद्र शिंदे,संदीप पवार यांनी केले.

333