कडवई:
मेधुमेह रुग्णांची वाढत चाललेली संख्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या दिवसेंदिवस त्रासदायक बनत चालल्या आहेत. त्यामुळे “हरियाल फाऊंडेशन”आणि “हरी नमो फाऊंडेशन”यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संगमेश्वर-चिपळूण मतदारसंघाचे लाडके आमदार शेखरजी निकम यांच्या सहकार्याने सावर्डे येथे मधुमेह शिबिर आयोजित करण्यात आली आहे.प्रसिद्ध मधुमेह विशेषज्ञ मिलिंद रुके यांनी या भागातील गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा रुग्णांना ते शिबिरानंतर मोफत औषधोपचाराची मदतही करु शकतात,अशी ग्वाही डॉ. रुके यांनी दिली आहे. हे शिबिर सामान्य मधुमेही रुग्णासाठी नसून अत्यंत प्रगत अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी आहे.
20 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पांच वाजेपर्यंत शिबिर असेल.शिबिरात मधुमेहाची तपासणी मिलिंद रुके मधुमेह विषेतज्ञ यांच्याकडून करण्यात येणार आहे.या शिबिराचा लाभ रत्नागिरी जिल्ह्याच्या जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा अशी विनंती हरियाल फाऊंडेशन व हरी नमो फाऊंडेशन यांच्या कडून करण्यात येत आहे.