संगमेश्वर पोलिस ठाणे आणि लायन्स क्लबच्या मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद

संगमेश्वर :
गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केलेल्या संगमेश्वर मॅरेथॉन स्पर्धेला पावसातही प्रचंड प्रतिसाद मिळाला. संगमेश्वर पोलीस ठाणे व लायन्स क्लबच्या या मॅरेथॉनबाबत नागरिकांत उत्सुकता होती.संगमेश्वर तालुक्यात मॅरेथॉन स्पर्धा भरविणे व या मॅरेथॉन स्पर्धेला मिळालेल्या शेकडो स्पर्धकांचा प्रतिसाद पाहता संगमेश्वर पोलीस ठाणे व लायन्स क्लब या आयोजकांचे कौतुक होत आहे.अशा स्पर्धा दरवर्षी भरविण्यात याव्यात असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी केले.संगमेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पोलीस उपविभागीय अधिकारी वाघमोडे,पोलीस निरीक्षक उदय झावरे,नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये लायन्स क्लब अध्यक्ष सतीश पटेल,दिलीप रहाटे,विवेक शेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये महिला ओपन गटामध्ये साक्षी संजय जड्याळ प्रथम क्रमांक हिने पाच किलोमीटर अंतर १८:१५ मिनिट,प्रमिला पांडुरंग पाटील,द्वितीय क्रमांक १८:४५ मिनिट,निकिता अतुल मरले २०:१० मिनिट,तृतीय क्रमांक,साक्षी सुभाष पवार चौथा क्रमांक २१:५१ मिनिट साक्षी शंकर नवाले २१:५४ मिनिट पाचवा क्रमांक पुरुष लहान गट ५ कि.मी. स्वराज संदीप जोशी प्रथम क्रमांक १५:४३,महादेव गजानन कोलेकर द्वितीय क्रमांक १६ मिनिट,विकास रामविलास राजभर तृतीय क्रमांक १६:०६ आयुष सुनील घाणेकर चौथा क्रमांक १७:१८ ऋतुराज रवींद्र हुमने पाचवा क्रमांक १७:२३ मिनिट लहान गट मुली ३ किमी उमेरा हुमायून सय्यद प्रथम क्रमांक ११:३० मिनिट,अनुजा निलेश पवार द्वितीय क्रमांक ११:३२,कोमल विश्वास रेवाळे तृतीय क्रमांक १२:४३ मिनिट, संजना संतोष हरावडे चौथा क्रमांक,१२:४५ मिनिट,करीना विलास आधावडे पाचवा क्रमांक १३:१९ मिनिट,पुरुष मोठा गट दहा किलोमीटर संजय मारुती झाकणे प्रथम क्रमांक ३१:०७ मिनिट,करण वीरेंद्र शर्मा द्वितीय क्रमांक ३१:२० मिनिट,ओंकार विष्णू बैकर तृतीय क्रमांक ३१:३० मिनिट,संदीप रामचंद्र पाल ३१:५३ मिनिट,चौथा क्रमांक आणि अक्षय परशुराम पडवळ ३२:२५ पाचवा क्रमांक पटकाविला ही स्पर्धा संगमेश्वर पोलीस ठाणे आणि लायन्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक देशमुख,पोलीस नाईक सचिन कामेरकर,भाऊ मोहिते,किशोर जोयशी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

133