देवरुख न्यू इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यानी साधला सीमेवरील जवानांशी संवाद

देवरुख :-

शहरातील न्यू इंग्लिश स्कूल देवरूखच्या विद्यार्थ्यां कडून सीमेवरील जवानांना नुकत्याच राख्या व संदेश पत्र पाठविण्यात आले होते.सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करत असतात. त्यांच्या या कामाला सलाम म्हणून तसेच त्यांच्याबद्दल असलेल्या बंधुत्वाच्या नात्यामुळं त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यार्थानी राख्या तसेच संदेश पत्र तयार पाठविण्यात आल्या. शाळेच्या स्काऊट गाईड विभागामार्फत रक्षाबंधन सणासाठी सीमेवरील जवानांनाराख्या व शुभ संदेश पोहचल्यावर लेह लडाख या भागात कर्तव्यावर असणाऱ्या सैनिकांनी शाळेला फोन वर संपर्क करून राख्या पोहचल्याचे तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले शुभ संदेश भावल्याचे सांगितले तसेच या बाल दोस्तांबरोबर संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली.

या वेळी शाळेतील वेगवेगळ्या इयत्तातील मुलांना एकत्र करून या सैनिकांबरोबर फोन वर संभाषण करण्याची संधी मुलांना मिळाली. मुलांनी देखील या वेळी सैनिक जीवन कसे असते? तेथील सध्या वातावरण कसे आहे ? सैनिक व्हायचे असेल तर शालेय जीवनापासुन कोण कोणती तयारी करायचीॽ तेथील दिनचर्या कशी असते ? असे अनेक प्रश्न विचारत त्यांच्याशी संवाद साधला.शाळेच्या स्काऊट आणि गाईड विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .

333