कडवई येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात

कडवई येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात
तुरळ-कडवई रस्त्यावर कडवई येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात झाला. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला बाजू देताना हा अपघात झाला.

कडवई:
तुरळ-कडवई रस्त्यावर कडवई तिठा येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात झाला. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला बाजू देताना हा अपघात झाला.तुरळ-कडवई जाणारा रस्ता हा खूपच अरुंद आहे तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत व झुडपे वाढल्याने रस्त्याची काठेवर असणारे गटाराचा अंदाज येणे कठीण आहे. याविषयी माहिती अशी की, माखजन देवरुख व्हाया कडवई जाणारी संध्याकाळची एसटी बस कडवई येथे ही आली असता वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला बाजू देताना बस रस्त्याच्या बाजूला गटारात कलंडली.हा अपघात बुधवारी संध्याकाळी ७ च्या दरम्यान घडला. मात्र यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

 

यावेळी उपसरपंच दत्ताराम ओकटे यांनी बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे सफाईची मोहीम तत्काळ हाती न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार करुन देखील याकडे दुर्लक्ष केल्याने आज ही दुर्वघटना घडली. पत्रकार मुजीब खान, पत्रकार मिलिंद चव्हाण यांनी बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडली असे म्हटले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी आणखीनच धोकादायक बनला आहे.

223