शिक्षक दिनाच्या पार्श्वभुमीवर संगमेश्वरात शिक्षकांचा सन्मान

कडवई :
शिक्षक दिनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक कार्यकर्ते दिनेश आंब्रे यांच्या कडून संगमेश्वर येथील शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम पुर्व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. समाजाचा नव्हे तर देशाचा आधारस्तंभ,समाजाचा केंद्रबिंदू,देशाचे मनुष्यबळ निर्माण करणारा महत्त्वाचा घटक हा शिक्षक असतो असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दिनेश आंब्रे यांनी केले.

ml
यावेळी आदर्श निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती.वैशाली दिलीप कुचेकर (नावडी),रिटायर्ड मुख्याध्यापिका सुहासिनी शशिकांत डेरे,अनुराधा शेट्ये,अर्चिता कोकाटे पैसा फंड इंग्लिश स्कूल, धनंजय शेट्ये पैसा फंड ज्युनियर कॉलेज यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

322