कोमल रहाटे यांना दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशनतर्फे ‘आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव पुरस्कार’ जाहीर

 

कडवई:मुजीब खान 
दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन सामाजिक सेवाभावी संस्था गोवा यांच्या वतीने संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच भारतीय जनता पक्षाच्या संगमेश्वर तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ.कोमल संजय रहाटे यांना राष्ट्रीय ‘आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव पुरस्कार ‘जाहीर झाला आहे.
दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशनतर्फे कर्नाटक,महाराष्ट्र, गोवा राज्यातील प्रतिभावंतांना गौरवण्यात येते. कोमल रहाटे यांना हा पुरस्कार राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवार्ड २०२२ अंतर्गत देण्यात येणार कोल्हापूरी फेटा,श्रीफळ,सम्मानचिन्ह,गौरव पत्र,मेडल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक २५/०९/२०२२ रोजी दुपारी ०१:०० वाजण्याच्या सुमारास गोवा येथे होणार कोमल संजय रहाटे यांना दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

322