रामपेठ अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम संपन्न

*रामपेठ अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम संपन्न*
संगमेश्वर: (दिनेश आंब्रे) 

पोषण अभियान सुरू झाल्यानंतर दरवर्षी सप्टेंबर हा महिना, ‘पोषण महिना’ म्हणून पाळला जाऊ लागला.रामपेठ अंगणवाडी येथे बुरंबी बिट अंतर्गत असलेल्या सर्व अंगणवाडी यांचे वतीने राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम संपन्न यावेळी व्यासपीठावर मान्यवर म्हणून नावडी सरपंच प्रज्ञा कोळवणकर,प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना यादव,ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा शेरे,योगिनी डोंगरे,ज्ञान प्रबोधनी(पुणे)सदस्या समता उदय झावरे,उमेद ग्रामसंघ अध्यक्षा प्रिया सावंत आदी उपस्थित होते.या सर्वांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात रांगोळी स्पर्धेत संध्या विकास शेरे,सलोनी राकेश घाग,निता चंद्रकांत जाधव प्रथम,द्रित्तिय व तृतीय क्रमांक पारितोषिक वितरण करण्यात आले.पाककला स्पर्धेत दिपाली दिपक लोहलकर,अर्चना हेमंत जोशी,श्यामल शांताराम जाधव यांनी प्रथम,दृत्तीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक शितल दिनेश आंब्रे यांना देण्यात आले. यावेळी परिक्षक म्हणून कुमार करण कैलास शेट्ये यांनी काम केले.

यावेळी महिला सक्ष्मीकरणावर समता उदय झावरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.वालावलकर ट्रस्ट तर्फे डॉ. नेहा साबणे व श्रध्दा खराडे (MSW)यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले व हेमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.लॅब टेक्निशियन अर्पिता शेट्ये (RH संगमेश्वर)यांनी काम पाहिले.किशोरवयीन मुलींचा कार्यक्रम संपन्न वंदना यादव, सरपंच प्रज्ञा कोळवणकर, मकरंद सुर्वे,समता झावरे,सचिन शेरे,दिनेश आंब्रे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात वंदना यादव यांनी मनोगत व्यक्त केले.मुत्तुह फायनन्सच्या कार्यकर्त्या मिताली मिलिंद भिंगार्डे यांनी बचत कशी करावी हे समजाऊन सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पल्लवी शेरे यांनी केले तर सुत्रसंचालन सुखदा शिंदे यांनी केले.शेवटी आभार शितल आंब्रे यांनी मानले.

233