संगमेश्वर :
संगमेश्वर तालुक्यातील चिखली गावात शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते येथील कृषिदुतानी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेती शाळेचे आयोजन केले यावेळी महिला शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेती पुरक व्यवसाया विषयी मार्गदर्शन करण्यात आले.त्यामधे सेंद्रिय शेती,अळंबी उत्पादन, मधुमक्षिका पालन तसेच विविध प्रकारचे रोग आटोक्यात आणण्यासाठी वापरले जाणारे सापळे यांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली.तसेच अळंबी उत्पादनातुन आणि मधुमक्षिका पालनातुन मिळणारे भरघोस उत्पादन आणि त्यासाठी मिळणारे शासकीय अनुदान व गुंतवणूक या विषयावर देखील चर्चा केली.
या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य सुनित कुमार पाटील सर व प्रा.मिथुन पाटील सर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले यावेळी विद्यालयातील विद्यार्थी अभिषेक जानकर,चेतन कांबळे,अथर्व पोळ,पुष्पराज देशमुख तसेच चिखली गावातील ग्रामस्थ तसेच चिखली गावातील उमेद अभियानांतर्गत सेंद्रिय प्रभाग समन्वयक,तालुका व्यवस्थापक व ग्रामस्थ उपस्थित होते.