रामपेठ अंगणवाडी येथे नवरात्र उत्सवा निमित्त विविध उपक्रम

  संगमेश्वर: (दिनेश आंब्रे)

नवरात्री उत्सव अर्थात देवीशक्तीचा जागर करण्याचा उत्सव या निमित्त सर्वत्र विविध रूपातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात येत असताना संगमेश्वर राममंदिर जवळील रामपेठ अंगणवाडीत नवरात्रोत्सव निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले.नावडीच्या प्रथम नागरिक सरपंच प्रज्ञा कोळवणकर यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सरस्वती पूजन, फळ वाटप,गरबा,मागील पार पडलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा,दहिहंडी स्पर्धा,आषाढी दिंडी यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.


फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम क्रमांक आरोही मोरे(झांसीची राणी),दृत्तीय सिध्दाई पाटील (सावित्री बाई फुले),तृतीय क्रमांक आदित्य पवार (सैनिक) तर उत्तेजनार्थ पारितोषिक विघ्नेश साळसकर व विवान भिंगार्डे तसेच आषाढी दिंडी वेषभूषा प्रथम क्रमांक आरोही मोरे (राधा),श्रेया वाडकर,शुभ्रा तेरवणकर तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक काव्या शेट्ये,अंशिका देशपांडे,पारस भुरवणे,आयशा मयेकर यांना मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू बक्षिस देण्यात आल्या तसेच चित्रकला स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले. पत्रकार वहाब दळवी व यांना सरपंच प्रज्ञा कोळवणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर नावडी सरपंच व प्रथम नागरिक प्रज्ञा कोळवणकर,उपसरपंच विवेक शेरे, ग्रा.पं. सदस्या प्रतिक्षा शेरे,माजी सरपंच नम्रता शेट्ये,बुरंबी बीट प्रमुख सुखदा शिंदे,ग्रामसंघ अध्यक्षा प्रिया सावंत,बचतगट सीआरपी मनाली सुर्वे,ज्येष्ठ नागरिक कासम खान, पत्रकार वहाब दळवी,दिनेश आंब्रे उपस्थित होते.कार्यक्रमामध्ये दिनेश आंब्रे व सुखदा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी शेरे यांनी केले तर आभार शितल आंब्रे यांनी केले.या कार्यक्रमाला येथील बहुसंख्य ग्रामस्थ,शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

303