संगमेश्वर:सादीक नायकोडी
महिला उद्योजक समाजामध्ये व्यवस्थापन, संघटन व व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये निरनिराळे आयाम प्रस्तुत करीत आहेत.महिलांनी परिचालीत केलेल्या उपक्रमांची संख्या ही एकूण उपक्रमांच्या प्रमाणात फारच कमी आहे. आजच्या आधुनिक गतिमान युगात शाश्वत आर्थिक व सामाजिक विकासाच्या जागतिक वाटचालीमध्ये महिला उद्योजकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.कौशल्य विकास आणि उद्योजक्ता मंत्रालय यांच्या वतीने तीन तालुक्याच्या प्रमुख दिपिका जोशी व दिपा जोशी यांच्या पुढाकाराने संगमेश्वर तालुक्यात महिला उद्योजक्ता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थानचे चेअरमेन डॉ. विनय नातू (माजी आमदार गुहागर)यांच्या शुभ हस्ते गणेश मंदिर माभळे (काष्टेवाडी)येथे याप्रसंगी संस्थानच्या जिल्हाप्रमुख सिमा यादव, संतोष घडशी,हरिभाई पटेल, प्रमोद शेट्ये,दिपक वेल्हाळ,पत्रकार दिनेश आंब्रे उपसरपंच नंदु जोशी, घोसाळकर आदी उपस्थित होते.
दुपारी नावडी (पागआळी)येथील लावण्य ड्रेस मेकिंग व टेलरिंग कोर्सेस या ठिकाणी संचालिका योगिनी डोंगरे यांचा व येथे कोर्स करणाऱ्या महिला व मुली यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.चेअरमेन डॉ. विनय नातू यांनी महिला कौशल्य विकास व उद्योजक्ता या सरकारच्या उपक्रमांबद्दल मार्गदर्शन यावेळी प्रमोद शेट्ये,अमोल मुळ्ये,उदय करमरकर, पत्रकार दिनेश आंब्रे,हरिभाई पटेल,दिपक वेल्हाळ,प्रमोद अधटराव,शैलेश डोंगरे, सिध्दी पाथरे,बापू सुर्वे व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.