रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची त्रैमासिक सभा संपन्न

संगमेश्वर: नियाझ खान 

रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची त्रैमासिक सभा शनिवार दिनांक ०८ आक्टोबर रोजी कसबा संगमेश्वर येथे समन्वय समिती अध्यक्ष सुभाष थरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज व शारदादेवीला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली.दापोली पासून राजापूर पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.संघ प्रतिनिधीनी अनेक विषयांवर चर्चा केली. चर्चेच्या दरम्यान उपस्थित प्रश्नावर अध्यक्षानी समर्पक उत्तरे दिली.यावेळी राजापूर येथे स्थापन होणाऱ्या संघाबद्दल उल्हास खडपे यांनी सभेला माहिती दिली.राजापूर संघाचे समन्वय समिती मध्ये स्वागत करण्यात समन्वय समितीचे सचिव दत्तात्रेय चाचले यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.कोषाध्यक्ष शामसुंदर सावंतदेसाई यांनी जमा खर्च सादर केला.
खेड ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विवेक उर्फ राजन दांडेकर यांची फेस्काॅम कोकण विभागीय कार्यकारिणीत संघटक सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सभेत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.सभेचे प्रस्ताविक संगमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये यांनी केले व स्वागत व आभार शास्त्री परिसर संघाचे अध्यक्ष मुरलीधर बोरसूतकर यांनी या सभेचे आयोजन संगम ज्येष्ठ नागरिक संघ,संगमेश्वर व शास्त्री परिसर ज्येष्ठ नागरिक संघ, संगमेश्वर यांनी संयुक्त रित्या केले होते. या दोन्ही संघांना उत्कृष्ठ आयोजनासाठी अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी धन्यवाद दिले.सभेनंतर सहभोजन होऊन सभेची सांगता झाली.

111