कडवई 10 डिसेंबर 2022 :
एकता क्रीडा मंडळ (करंबेळे) आयोजित पंचक्रोशी व निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ जानेवारी ते ८ जानेवारी २०२२ या कालावधी दरम्यान होणार आहे.क्रिडा महोत्सवाचे हे ३५ वे वर्ष असणार आहे.
या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या ३० संघाना प्रवेश दिला जाणार आहे.
या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम ७०३६ व कै.चंद्रकांत उर्फ बावा चव्हाण स्मृती चषक, द्रितीय पारितोषिक रोख रक्कम ५०३५ व कै.रामचंद्र जाधव स्मृती चषक देण्यात येणार आहे. या व्यतीरिक्त चषक व आकर्षक बक्षिस दिलीप देवळे यांचकडून देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी रुपये ४००/- राहील.संघाचे नाव नोंदणी करण्याची अंतीम तारीख २ जानेवारी २०२३ आहे.नाव नोंदणी साठी संपर्क करा.शरद-९४०३४६१५७०,९४०४९९४८४१,स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक संघानी आपली नाव नोंदणी करून मंडळाला सहकार्य करावे अशी विनंती मंडळाच्या वतीने संस्थापक मा.उदय पवार व सहकारी यांनी केली आहे. स्पर्धा कै.राजाभाऊ लोटणकर क्रिडा नगरी ग्रामपंचायत करंबेळे आॅफिस समोर घेण्यत येणार आहे.