इचलकरंजी:प्रतिनिधी
दि:३०जुन:यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स या संस्थेची सन 2023-28 सालची पंचवार्षिक निवडणूक आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या प्रयत्नाने बिनविरोध पार पडली.
संस्थेच्या नूतन संचालक मंडळात मुकुंद पोवार, आदित्य आवाडे, श्रेणिक मगदूम, आनंदा दोपारे, चंद्रकांत घाटगे, रणजितसिंह गायकवाड, योगेश पाटील, राजेश भिसे, सुहास कांबळे (सर्वसाधारण अ गट). राजाराम बोंगार्डे (सर्वसाधारण ब गट). रमेश कबाडे व मोहन काळे (सर्वसाधारण क गट). अरुण निंबाळकर (अनुसूचित जाती जमाती गट). अहमद मुजावर (इतर मागासवर्गीय गट). रवींद्र जावळे, (विमुक्त जाती भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग गट). जेवरबानु दुंडगे व सौ.लक्ष्मी सपाटे (महिला राखीव गट) यांचा समावेश आहे.
नूतन संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये सर्वांनुमते चेअरमनपदी अहमद मुजावर व व्हा.चेअरमनपदी राजाराम बोंगार्डे यांची निवड करण्यात आली. यावेळी स्वप्नील आवाडे यांच्या हस्ते एस. एस. शिंदे तसेच नवनिर्वाचित संचालक व चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक शफीक मणेर उपस्थित होते.