सांगली:प्रतिनिधि
दि:२९:ऑगस्ट: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भेट देऊन, तेथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला.
तसेच, जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ येथील रूग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या विद्यार्थ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कसूर ठेवू नये, अशा सूचना आरोग्य प्रशासनास दिल्या