मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी इंडिया आघाडीला शह देण्यासाठी महायुतीची बैठक

मुंबई:प्रतिनिधि

दि:३१:ऑगस्ट: राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरुवात झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील शिवसेना,भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख मंत्री आणि नेते उपस्थित होते

. येत्या लोकसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची रणनीती या बैठकीत ठरविण्यात आली राज्यात विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी नक्की काय रणनीती आखावी यावर या बैठकीत चर्चा झाली.