कंटेनर मधून प्रतिबंधीत गुटखा विक्रीस घेऊन जाणाऱ्या दोघांना खेड पोलीसांनी केली अटक

खेड:प्रतिनिधी

दि:०६:नोव्हेंबर:खेड पोलीस ठाणे हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोरून, बेकायदेशिर गुटखा वाहतूक होत असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने, लागलीच खेड पोलीस निरीक्षक व स्टाफ यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोर नाका बंदी करण्यात आली. या नाकाबंदी दरम्याने आज दिनांक 05/11/2023 रोजी 02.30 वा. च्या सुमारास एका संशयित “Ashok Leyland-Bada Dost” या वाहनाला (क्रमांक-एमएच-46-बीयु-8164) खेड पोलीस स्टाफ मार्फत थांबवण्यात आले व त्यास चेक केले असता सदर वाहनात “गुटखा” हा प्रतिबंधीत अन्नपदार्थ मिळून आलेला आहे

  सदर कारवाई मध्ये, 

1) विमल पान मसाला व V-1 तंबाखू असा मिळून ₹ 8,80,200/- किमतीचा व 

2) “Ashok Leyland-Bada Dost” हे वाहन ₹ 9,25,000/- असे मिळून एकूण ₹ 18,05,200/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

तसेच या वाहनावरील चालक 1) प्रेमल शंकर मोकळ वय-35 वर्षे, रा. वाशीनाका, घर क्रं. 104, पेण, जि. रायगड व 2) जगदिश हरीश्चंद्र म्हात्रे वय-33 वर्षे, रा. कांदळेपाडा, पेण, जि. रायगड या दोघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदरचा “प्रतिबंधीत गुटखा” हा, वरील नमूद आरोपी हे विक्री करिता घेऊन जात असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर ३४०/२०२३ भा. द. वि. संहिता कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ व अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे कलम २६(१), २६(२) २६(२i), २६(२ Iv), २६(३ d), २७ (३९), ३०(२ ३) अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. 

तसेच सदरची कारवाई, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री. राजेद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी खेड पोलीस ठाणे श्री. नितीन भोयर व अंमलदार यांनी केली आहे.