कडवईत सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवदान

  • कडवई : (मिताली कडवईकर)
  •    कडवई चर्मकारवाडीत राहणारे रहिवासी श्री.संजय साळुंखे यांच्या घराजवळ आलेल्या अजगराला सर्पमित्रांनी जीवदान दिले.
  • रविवारी सकाळी श्री साळुंखे यांच्या घराशेजारी असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात भलामोठा अजगर घुसलेला आढळून आला.श्री.साळुंखे यांनी तातडीने सर्पमित्र श्री.कुंडलिक देऊलकर व अक्षय यादव यांना पाचारण केले. त्यांनी मोठ्या कौशल्याने सातफुटी अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. तोपर्यंत अजगराने खुराड्यातील 3 कोंबड्या मारल्या होत्या,तर एक कोंबडी फस्त केली होती.अजगर घुसल्याची बातमी पसरताच परिसरातील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
    कडवई पंचक्रोशीत गेली अनेक वर्षे साप आढळून आल्यास सर्पमित्र कुंडलिक देऊलकर, अक्षय यादव,आमिर खान,आसिम मोडक,अनिकेत यादव हे लोकांच्या मदतीला धावून जात असल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.