इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि:१ जानेवारी २०२४ : देशातील सर्व ११ टेक्सटाईल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सीलच्या वतीने नवी दिल्ली येथे २६ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मेगा टेक्सटाईल शो ‘भारत टेक्स २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्लोबल टेक्स्टाईल एक्स्पीच्या प्रसार आणि प्रचारासाठी पॉवरलूम डेव्हलपमेंट अॅन्ड एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल अर्थात पिडीक्सिलच्या वतीने इचलकरंजी येथे शनिवार ६ डिसेंबर २०१४ रोजी रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिडीक्लिसचे चेअरमन विश्वनाथ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते स्हणाले, नथीदिल्ली येथे केंद्रीय वस्पोद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठे जागतिक वरोद्योग प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने रोड शो चे आयोजन करण्यात येत आहे. इचलकरंजीत ६ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता डीकेटीई येथील ऑडीटोरीयम हॉल येथे हा रोड शी होणार आहे. यामध्ये केंद्रीय वस्पोद्योग मंत्रालयाच्या आयुक्त श्रीमती रूप राशी आणि महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर वस्योद्योग मंत्रालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि वस्त्रोद्योग आणि वरुष क्षेपातील आघाडीचे एक्स्पोर्टर आणि यंषमाण धारक आणि व्यापारी उपस्थित असणार आहेत. शनिवारी दुपारी ४.३० वाजता नोंदणी सुरू होईल आणि त्यानंतर सायंकाळी ५ ७.३० मुख्य कार्यक्रम होईल. हा रोड शो पिडीक्सिलच्या वतीने होत असून यासाठी होकेटीई, इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशन आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांचे सहकार्य लाभत आहे.
नवी दिल्ली येथे २६ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणारे भारत टेक्स २०२४ एक्झिबिशन है २ लाख स्क्के, मीटर जागेत भरणार आहे. यामध्ये ३५०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून तब्बल ३ हजार परदेशी खरेदीदार (बायर) आणि ४० हजार व्यावसायिक सहभागी होणार आहेत.
सदर प्रदर्शन जागतिक स्तरावरील सर्वात मोठे असणार आहे. प्रदर्शनाचा उद्देश भारताची निर्यात वाढवणे करिता असल्यामुळे सदर रोड शोमध्ये जास्तीत जास्त व्यावसाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करणेत आले. सदर पत्रकार परिषदेस माजी चेअरमन सुनिल पाटील, कमेटी मेंबर गजानन होगाडे, आशिष भीजे, अविनाश मगदूम उपस्थित होते,