इचलकरंजी :कयुम शेख
दि .२० :आयोध्या भूमीमध्ये प्रभू श्री रामा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडत आहे. हि एक देशासाठी अभिमानास्पद आहे. सदर सोहळ्याचे निमित्ताने देशभरात अनेक धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करत आहे. त्यानुसार इचलकरंजी परीसारातील आयोध्य येथे गेलेल्या कार सेवक यांचा गौरव भारतीय जनता पार्टी इचलकरंजी वतीने राम भक्त श्री. सुरेश हाळवणकर व शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मनोगतात राम जन्म भूमी निर्माण कार्य हे एक आनंदाचा क्षण आहे. यासाठी सतत पाचशे वर्षापासून संघर्ष सुरु होता. राम जन्म भूमी मंदिर उभारणीसाठी शेकडो कार सेवकांनी बलिदान दिले, अनेक कारसेवक तुरुंगात गेले. राम मंदिर उभारणीसाठी कारसेवकांच्या बलीदानाचे त्यांनी अमुल्य योगदानातचे फळ म्हणजे आयोध्या नगरी मध्ये राम जन्मभूमीत रामलल्लाचे भव्यदिव्य मंदिर साकार झाले आहे असे गौरव उद्गार काढले. यावेळी भगतरामजी छाबडा यांनी सन १९९० व १९९२ साली आयोध्यामध्ये विवादित ढाचा पडतानाच घटनाक्रम सांगितला. व त्यावेळचे अनुभव प्रतीत केला. तसेच व्यंकटेश ओझा, डॉ. नार्वेकर, नारायण आपटे, व्यंकोबाजी कुंभोजे,यांच्यासह कार सेवक कुलकर्णी यांनी कविता वाचन केले. यावेळी कारसेवकांनी आपले अनुभव सांगितले. यावेळी रामभक्त कारसेवक व उपस्थित असलेले रामभक्त भाऊक झाले. अनेकांचे नेत्र आनंदाश्रुने पाणावले. २२ जानेवारी २०२४ हा दिवस अनेकांनी दिलेल्या बलिदानची स्मृती जागवणारा हा सुवर्णक्षण आहे.
दरम्यान भाजपा कार्यलयात कारसेवकांचे आगमन होताच जय श्री रामांच्या जय घोषणा देत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वगत करण्यात आले.त्यानंतर श्री. व सौ. भरत जोशी, श्री. व सौ. प्रविण पाटील, श्री. व सौ. अरुण कुंभार या दांपत्यांनी रामभक्त कारसेवकांचे पाद्यपूजन, ओवाळून औक्षण करण्यात आले. यावेळी कारसेवकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थितांचे आभार मानताना शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले यांनी कारसेवकांचा गौरव करण्याचा क्षण हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे.आहे सांगितले. तसेच २२ तारखेला सायंकाळी ६ वाजता शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रामज्योती सह पणत्या लाऊन दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व राम भक्तांनी या दीपोत्सवात सोहळ्यास उपस्थीत रहावे असे आवाहन केले. यावेळी कार सेवकांच्या सह युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, भाजपा पदाधिकारी, महिला आघाडी, पदाधिकारी कार्यकर्ते, मान्यवर नागरिक मोठ्या उपस्थित होते. या कार्यक्रर्माचे नेटके नियोजन महेश पाटील व उत्तम चव्हाण यांनी केले.