नमो महारोजगार कोकण विभागस्तरीय मेळाव्यासाठी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

नमो महारोजगार कोकण विभागस्तरीय मेळाव्यासाठी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. २३ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने ठाणे जिल्ह्यामध्ये 29 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत “नमो महारोजगार” कोकण विभागस्तरीय मेळाव्याचे आयोजन आयलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी येथे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील विविध औद्योगिक आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावेत. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

24 फेब्रुवारी व 25 फेब्रुवारी रोजी होणारा हा रोजगार मेळावा  29 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी होणार आहे, याची देखील संबंधितांनी नोंद घ्यावी.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

29 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी ठाणे येथील आयलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा येथे होणाऱ्या “नमो महारोजगार” चा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना आज आढावा घेतला. जिल्ह्यातील अधिकाधिक आस्थापना, उद्योजकांनी सहभागी व्हावे. जास्तीत जास्त बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.

यावेळी समाजकल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी शशिकांत कोतवडेकर आदि उपस्थित होते.