आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून अंत्रवली परिसरातील विविध विकास कामाना मंजुरी-लियाकत नेवरेकर
कडवई:27/02/24
आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून अंत्रवली गावातील विविध विकास कामाना मंजुरी मिळाली आहे.अंत्रवली मोहल्ला कब्रस्तान रस्ता,धरण दुरुस्ती,अंत्रवली मोहल्ला कब्रस्तान सोयी सुविधा करणें, गीतेवाडी रस्ता डांबरीकरण करणे, मालपवाडी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, अंत्रवली गवळवाडी विहीर बांधणे,अंत्रवली गवळवाडी बंधारा बांधणे अशी विविध कामाना मंजुरी मिळाली आहे.
Creative Stainless Steel Camera Lens Shaped Coffee Cup.
Coffee Cup Gift Travel Drink Bottle With Lid.
Price-230 rs. Order.. 9860153462
अंत्रवली गावच्या विकासासाठी सदर कामे करणे आवश्यक होते. याबाबत पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता.याला यश आले असून आमदार शेखर निकम यांच्या शिफारसीमुळेच निधी मंजूर झाला.अंत्रवली गावामध्ये विकास कामांसाठी लाखो रुपयांचा विकास निधी दिल्याबद्दल माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा.प.सदस्य लियाकतभाई नेवरेकर,अंत्रवलीती ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधींनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.