संगम जेष्ठ नागरिक संघ संगमेश्वर परिसर संगमेश्वर ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

संगमेश्वर(दि.०५) : 

संगम जेष्ठ नागरिक संघ संगमेश्वर परिसर ची वार्षिक-२०२४ चीसर्वसाधारण सभा दिनांक ०३-०३-२०२४ रोजी विधात कलेक्शन संगमेश्वर च्या हॉल मध्ये उत्साहात संपन्न झाली.
याबत सविस्तर वृत्त असे की या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थानी संगम जेष्ठ नागरिक संघ परिसर संगमेश्वरचे विद्यमान अध्यक्ष प्रमोद शेटे हे होते तर व्यासपीठावर संगमेश्वर व्यापारी संघाचे अध्यक्ष,प्रमोद भिंगार्डे, संगम जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष शशिकांत खातू,कार्यवाह,उदय संसारे,संगम जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष आणि संघाचे जेष्ठ सल्लागार भाऊ साळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीला व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि सभेला उपस्थित असणाऱ्या सर्व सभासदांचे शाब्दिक स्वागत करून सभेचे अध्यक्ष यांची निवड करण्यात आली.त्यांनतर संगमेश्वर परिसरातील ज्या ग्रामस्थ बंधू,भगिनी,संगम जेष्ठ नागरिक संघातील ज्या सभासदांचे निधन झाले आणि विशेष म्हणजे लोकसभेचे माजी सभापती,माजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एक सुसंस्कृत,अभ्यासू व्यक्तिमत्त्व आदरणीय कैलासवासी मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांना संगम जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सन्मानित करून यथोचित सत्कार करण्यात आला.सभेचे प्रास्ताविक संघाचे कार्यवाह श्री उदय संसारे यांनी केले त्यामध्ये त्यांनी संघाच्या वार्षिक अहवालाचे वाचन करत असतानाच संघाची यशस्वी वाटचाल यावर दृष्टिक्षेप टाकत असताना संगमेश्वर परिसरातील सर्वच जेष्ठ नागरिकांनी या संघात सहभागी व्हावे असे आवाहन केले

संघात नव्याने सहभागी झालेले सभासद रामचंद्र दोरकडे,जनार्दन शिरगावकर,विनय शेटे,अविनाश चोचे,संजय रेडीज इत्यादिंचे संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तर ७० ते ८० वयोगटातील,संगम जेष्ठ नागरिक संघातील भाऊ साळवी,प्रमोद पोवळे,शशिकांत डेरे,मुरलीधर पवार,जयप्रकाश शिंदे,दादा सैतवडेकर,प्रमोद भिंगार्डे,प्रभाकर वाडकर,अशोक प्रसादे,प्रमोद शेटे,अशोक शेट्ये,जयसिंग सावंत, गजानन खातू इत्यादी सभासदांचा भेटवस्तू देऊन सन्मान सत्कार करण्यात येऊन त्यांना भावी वाटचालीस संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रमोद शेटे यांनी अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकत असतानाच, जेष्ठ नागरिक ही संकल्पना विशद करून जेष्ठ नागरिक यांनी काळाची पाऊले ओळखून कसे सतर्क राहावे,आपल्या वार्धक्याकडे चाललेल्या वयाचे कसे नियोजन असावे शारीरिक तपासणी किती महत्वाची आहे आणि सामाजिक बांधिलकी यावर सुंदर मार्गदर्शन केले.तसेच संघाच्या माध्यमातून आपला वेळ सातकर्णी लावावा असे आवाहन केले.संपूर्ण सभेचे आणि सत्कार कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक रोशन शिंदे यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार मानून पसायदानानाने सभेची सांगता झाली.