सिंधुदूर्ग क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक काय करायचे, काय करायचे नाही याबाबत दक्ष रहा -जिल्हाधिकारी

सिंधुदूर्ग क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक काय करायचे, काय करायचे नाही याबाबत दक्ष रहा -जिल्हाधिकारी
रत्नागिरी, दि. 4 : काय करायचे आणि काय करायचे नाही, याबाबत सर्वांनी दक्ष रहावे, त्याचबरोबर दिलेली जबाबदारी एकमेकांच्या समन्वयाने पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली.

राजापूर येथील आबासाहेब मराठे ऑर्टस ॲण्ड न्यू कॉमर्स, सायन्स कॉलेज मधील इनडोअर स्पोर्ट स्टेडियममध्ये सिंधुदूर्गमधील विधानसभा मतदार संघनिहाय क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी काल आढावा बैठक घेतली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदूर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, सिंधुदूर्गचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आदी उपस्थित होते.

Order .. 9860153462

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कार्य व जबाबदाऱ्या यात विशेषत: मतदान पूर्व आणि मतदान दिवशीची जबाबदारी यांचा समावेश होता.
मतदान केंद्रावर योग्य निवडणूक व्यवस्थापन असल्याची सुनिश्चिती, त्याचबरोबर अश्वासित सुविधांची खात्री करणे, रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसे फर्निचर, योग्य प्रकाश व्यवस्था, विद्युत व्यवस्था, प्रसाधनगृहे, मतदान पूर्व संध्येची जबाबदारी आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, मतदारांना ‘व्होटर इन्फॉरमेशन स्लीप’ अर्थात मतदार चिट्टीचे वाटप बिएलओमार्फत पूर्ण करावे. याचे वाटप झाले की नाही, याबाबतही खातरजमा करावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करावी. दिलेले काम समन्वयाने चोखपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विषयक साहित्याचे वाचन करावे.