रत्नागिरी:
आगामी निवडणूक-2024 तसेच सण व उत्सवांच्या अनुषंगाने रत्नागिरी शहारा मध्ये मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च घेण्यात आला. या रूट मार्च करिता अपर
पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. नीलेश मईनकार, पो.नि. श्री. महेश तोरस्कार, पो.नि. श्री. नितीन ढेरे व पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सहभाग घेतला.