स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची खेड येथे मोठी कारवाई, दोन विनापरवाना बंदुका हस्तगत- दोन आरोपी जेरबंद.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची खेड येथे मोठी कारवाई, दोन विनापरवाना बंदुका हस्तगत- दोन आरोपी जेरबंद.

खेड: दिनांक:(20-4-2024)
लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विनापरवाना बंदुका वापरणाऱ्यांवर कारवाई करणे बाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिलेल्या होत्या. सदर सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परकर यांनी एक पथक तयार केलेले होते.

दिनांक 19-4-2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हे खेड उपविभागात लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे बोरस तालुका खेड येथे खालील प्रमाणे कारवाई केलेली आहे.
मौजे बोरस शिवफाटा शेवरवाडी तालुका खेड येथील पहिल्या कारवाईत अनिल भिकू गुहागरकर वय 53 वर्षे राहणार बोरज शिवफाटा, शिवरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी याचे ताब्यात सिंगल बॅरल काडतूसची बंदूक व 8 जिवंत काडतूसे बिगर परवाना मिळून आल्याने सदरचा 27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

मौजे बोरस शिवफाटा शेवरवाडी तालुका खेड येथील दुसऱ्या कारवाईत राजेश गजानन साळवी वय 53 वर्षे राहणार बोरज शिवफाटा, शिवरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी याचे ताब्यात सिंगल बॅरल काडतूसची बंदूक व 4 जिवंत काडतूसे बिगर परवाना मिळून आल्याने सदरचा 26,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक श्री.जनार्दन परबकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे आकाश साळुंखे, विजय आंबेकर,सागर साळवी, योगेश नार्वेकर, दत्ता कांबळे यांनी केलेली आहे.