संगमेश्वर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस फौजदार प्रशांत संभाजी शिंदे यांना पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित
संगमेश्वर: (एजाज पटेल)
पोलीस महासंचालक पदकाचे मानकरी ठरलेल्या संगमेश्वर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत संभाजी शिंदे यांना दिनांक १ मे या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रशांत शिंदे हे संगमेश्वर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार म्हणुन कार्यरत असून गेली 33 वर्षे ते पोलीस दलात कार्यरत आहेत. एक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणुन जिल्ह्यात सुपरिचित असून त्यांनी 33 वर्षीय पोलीस सेवेत देवरुख, खेड, रत्नागिरी, संगमेश्वर अशा ठिकाणी इमानेइतबारे व कर्तव्यदक्षपणे सेवा पार पाडत असून सध्या संगमेश्वर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस फौजदार म्हणुन सेवा बजावत आहेत.
कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणुन ख्याती असलेल्या प्रशांत संभाजी शिंदे यांच्या कार्याची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन त्यांची पोलीस महासंचालक पदकासाठी निवड करून तसे जाहीर करण्यात आले होते. काल दि १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या हस्ते प्रशांत शिंदे यांना मानाचा पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी, स. पो. उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, सचिन कामेरकर, किशोर जोयशी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.संगमेश्वर पोलीस ठाण्यासाठी हा बहुमान असून पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पो. उ. नी. शंकर नागरगोजे, पो. उ. नी. विवेक साळवी, स. पो. उप. नी. चंद्रकांत कांबळे यांनी तसेच येथील पोलीस कर्मचारी, सामाजिक, पत्रकार आदिकडून प्रशांत शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.