कडवई परिसरात अवकाळी वादळी पावसाने झोडपून काढले; वीज पुरवठा खंडीत

कडवई परिसरात अवकाळी वादळी पावसाने झोडपून काढले; वीज पुरवठा खंडीत

कडवई:
कडवई परिसरात गेल्या काही दिवसांत प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. हा उकाडा सहन करणे देखील कठीण झाले होते. असे असताना शुक्रवारी दुपारनंतर वाऱ्यासह ढगाच्या दाखल झालेल्या अवकाळी पावसाने कडवई परिसराला झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे कडवई परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला.शुक्रवारी दुपारनंतर उकाडा सुरू झाला होता आकाशात ढग दाटून आले होते. ढगाळ वातावरण दिसत होत. यामुळे पाऊस पडणार हे निश्चित होते. दुपारनंतर कडवई भागात तसेच परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस दाखल झाला.यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना थोडा दिलासा मिळाला आहे. कडवई परिसरात झालेल्या या अवकाळी वादळी पावसामुळे परिसरात पुन्हा बत्ती गुल झाली. वीज अधिकारी कर्मचारी तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.